विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत पत्नीने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या..

पुणे : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. विक्रम गोखले यांची तब्येत खालावली असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते गेल्या १५ दिवसांपासून या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे.८२ वर्षीय विक्रम गोखले यांची तब्येत सध्या नाजूक (Vikram Gokhale Health Update) असल्याने कुटुंबीय आणि चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार उपचांराना प्रतिसाद देत नसल्यानंविक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची प्रकृती अद्याही चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या निधनाचं वृत्त फेटाळलं आहे.

न्यूज 18 लोकमतने  वृषाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विक्रम गोखलेंच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं.  ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती सुधारतीये की खराब होतीये आणि ते उपचारांना कशाप्रकारे प्रतिसाद देतात यावर डॉक्टर आज सकाळी काय करायचं ते ठरवतील असं त्यांनी सांगितलं.