घरगुती वादातून केला कत्तीने सपासप वार करुन पत्नीचा खून; आरोपी अद्यापही फरार

नांदेड : घरगुती वादातून पतीने पत्नीवर कत्तीने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना मुखेड तालुक्यातील निमजगा तांडा येथे दि.२० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. दरम्यान जखमी पत्नीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून मुक्रमाबाद पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतू, आरोपी पती अद़यापही फरार आहे.

मुखेड तालुक्यातील निमजगा तांडा येथील जिजाबाई राठोड (५५) व त्यांचा पती हर‍िचंद्र राठोड या दोघांचा २० नोव्हेंबर रोजी घरगुती कारणावरुन वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात आरोपी पती हरिचंद्र राठोड याने पत्नी जिजाबाईवर कत्तीने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. सदर महिलेस जखमी अवस्थेत विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तान्हाजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपी पतीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी मात्र, अद़यापही फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपीनाथ वाघमारे हे करीत आहेत.