महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या चित्रा वाघ यांना मिळणार विधान परिषदेसाठी संधी?

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 9 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेतून सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यासह सुभाष देसाई(subhash desai), दिवाकर रावते(diwakar Rawate), (शिवसेना) प्रवीण दरेकर(Pravin darekar), सदाभाऊ खोत(sadabhau khot), प्रसाद लाड(Prasad lad), विनायक मेटे(Vinayak mete), सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (Sujit Singh Thakur, late. R. S. sinh) (सर्व भाजप) संजय दौंड(sanjay duand) (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील.

मात्र भाजप आपला पाचवा उमेदवार रणांगणात उतरवेल अशी शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या ७ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात पंकजा मुंडे, राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि गोपाल अग्रवाल यांच्या नावांची चर्चा आहे. तर प्रविण दरेकर यांचं नाव निश्चित आहे.

चित्रा वाघ गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडीविरोधात सातत्याने भूमिका मांडत आहेत. तीन पक्षांच्या सरकारवर टीकेची त्या एकही संधी सोडत नाहीत. यामुळेच चित्रा वाघ यांनाही संधी मिळू शकते.असं काही जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. चित्रा वाघ यांना संधी देणे भाजपसाठी सुद्धा फायद्याचे ठरू शकेल कारण त्या विधान परिषदेत  भाजपची जोरदार आणि आक्रमकपणे बाजू मांडू शकतील.