लवकरच ‘देवमाणूस २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ या मालिकेने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मालिकेचा शेवट ज्या प्रकारे दाखवण्यात आला ते पाहून मालिकेचा दुसरा सिझन लवकरच येणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल झाली आहे.

एका फॅन पेजने देवमाणूस मालिकेचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यावर ‘डिसेंबर महिन्यात देवमाणूस २ येणार? सध्या मालिकेच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु आहे’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे लवकरच ‘देवमाणूस २’ मालिका येणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काय होता मालिकेचा शेवट?

डॉक्टर बराच वेळापासून परतला नाही म्हणून गावकर त्याच्या शोधात बाहेर पडतात. गावा बाहेर त्यांना आग लागलेली दिसते. त्यात चंदाचा मृतदेह त्यांना दिसतो, तर जवळच डॉक्टरचा चष्मा, घड्याळ आणि पेन दिसतो, हे पाहता तो ही मेला असेल असे गावकऱ्यांना वाटते. एका रात्री सगळे झोपले असताना डिंपल बॅग घेऊन बाहेर पडते आणि रुग्णालयात जाते. तेथे एका माणसाला भेटते. तो माणूस मरोत आणि डॉक्टर त्या माणसाला मृत असल्याचे घोषित करतो. हा माणूस दुसरा कोणी नाही तर देवीसिंग असतो. डॉक्टर बाहेर जाताच तो जीवतं होतो आणि मालिका अशा प्रकारे प्रेक्षकांचा निरोप घेते. त्यामुळे आता मालिकेचा दुसरा सिझन भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील काही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Next Post

रवीना टंडनचा एका निर्णयामुळे; तिने कित्येक जणांचे टोमणे ऐकले

Related Posts
अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरात चोरी, चोरट्यांनी कोट्यवधींचा नेकलेस आणि रोकड पळवली

अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरात चोरी, चोरट्यांनी कोट्यवधींचा नेकलेस आणि रोकड पळवली

Actress Poonam Dhillon : बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लन हिच्या घरात चोरीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या…
Read More
नवीन पर्यटनस्थळ विकासाला गती देण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय महाबळेश्वरमध्ये सुरू करा - Shinde

नवीन पर्यटनस्थळ विकासाला गती देण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय महाबळेश्वरमध्ये सुरू करा – Shinde

Shinde | जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एमएसआरडिसीचे कार्यालय महाबळेश्वर…
Read More
अमरनाथ यात्रेत बर्गर-पिझ्झा, तंबाखू, गुटखा खाण्यावर बंदी, कोणते पदार्थ खाता येणार पहा यादी 

अमरनाथ यात्रेत बर्गर-पिझ्झा, तंबाखू, गुटखा खाण्यावर बंदी, कोणते पदार्थ खाता येणार पहा यादी 

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा (अमरनाथ यात्रा 2023) 1 जुलैपासून सुरू होत आहे. 62 दिवस चालणाऱ्या या धार्मिक यात्रेत मोठ्या…
Read More