पुणे | कसबा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर गळ्यात भगवा असलेला फोटो ठेवताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर काँग्रेसच्या नव्या संघटनेतून त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे आता धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार का, यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, “रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) जर शिवसेनेत येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
धंगेकर यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, त्यांच्या हालचालींवरून मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आता ते खरोखरच शिवसेनेत प्रवेश करणार का, की हा केवळ राजकीय दबाव तंत्राचा भाग आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल
‘हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा’, बॉलीवूड गायकाचं थेट योगींना आव्हान
गजा मारणेच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण; मुरलीधर मोहोळ यांचा संताप