सुप्रिया सुळे असणार राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार ? मुंबईत लावण्यात आला बॅनर 

Supriya Sule  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांचंही बॅनर मुंबईत लावण्यात आलं. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा  महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं. पण नंतर पोलिसांनी लगेचच हे पोस्टर काढल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे बॅनर लावून दोन दिवस झाले. आता खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावले आहे. त्यात महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असे म्हटले गेले आहे यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, काहीचं वेळात हा पोस्टर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तत्काळ काढून टाकण्यात आला आहे.