राज्यसभा निवडणुकीत सहयोगी आमदारांची नाराजी शिवसेनेला भोवणार ?

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा (Reputation of Mahavikas Aghadi government) या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) कोणताही धोका पत्करायचा नाही, असे धोरण ठेवून शिवसेना आमदारांना (Shiv sena MLAs) आता मडमधल्या ‘रिट्रीट’मध्ये पाठवण्यात आले. सध्या दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि सहयोगी आमदारांची बैठक सोमवारी सायंकाळी घेतली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची संधी साधत अपक्ष व सहयोगी आमदारांनी नाराजी सूर लावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.