महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या हाराकिरीनंतर राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी स्वत:ला झोकून द्यायचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत आज महाराष्ट्र भाजप कोअर कमिटी दिल्लीत पक्षनेतृत्वाची भेट घेणार आहे. अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी बीएल संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीसोबत दिल्लीत बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भूमिकेबाबत चर्चा होणार आहे. सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय संघटनेचं बळकटीकरण होणार नाही, यावर अजूनही देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. आपली भूमिका पक्ष आणि संघटनात्मक बांधणीच्या फायद्याचीच आहे, हे पटवून देण्यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, त्यामुळे याबाबत आता उद्या दिल्लीत नेमका काय निर्णय होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप