मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत, ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील – आदित्य ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं सांगतानाच विरोधकांचं काम आरोप-प्रत्यारोप करणं आणि जनतेला भरकटवणं आहे. तिकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

आज आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.ते म्हणाले, विरोधकांनी राजकारणाचा खालचा स्तर गाठला असल्याचंही ते काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनर्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. पण आम्हीच ओमायक्रॉनमुळे काळजी घेत आहोत. विरोधी पक्ष जे काही गलिच्छ राजकारण करत आहेत त्यावर फार काही बोलायचं नाही. ते कितीही खालच्या स्तराला जाऊ शकतात. आम्ही काही त्यांच्या तोंडी लागणार नाही,असं आदित्या ठाकरे म्हणाले.