फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला महिलेने दिला चोप

विरार : फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या (shiv sena) विभागप्रमुखाला महिलेने चांगलाच चोप (woman beat) दिला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन या शिवसेनेच्या (shivsena)विभागप्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार येथे हा प्रकार घडला. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालक आक्रमक झाल्या आहेत. परिसरात संताप व्यक्त होत आहे.

फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. विरार पूर्वेकडील साईनाथनगर येथील शिवसेनेचा विभाग प्रमुख जितू खाडे (Jitu Khade) असं या पदाधिकाऱ्याच नाव आहे. तर पीडीत महिला ही विरारलाच (Virar) राहते. जितू हा तिला फोन करुन, आयटम आहे का? अशी विचारणा करुन त्रास देत होता. शेवटी वैतागून महिलेने त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला रिक्षामध्ये बसलेला असताना, चपलाने मारहाण केली.

या घटनेचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. याप्रकरणी पोलिस तक्रारदेखील करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पीडित महिला ही विरारमधील रहिवासी असून या महिलेनं चक्क रिक्षातच शिवसेनेच्या विभागप्रमुखाला दिलेला चोप चांगलाच चर्चिला जातोय.