मुलांना भडकव, मास्तरांवर हात उचल, तुला शरीरसुख देईन; महिला शिक्षिकेची १७ वर्षीय मुलाला ऑफर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सुधारगृहातील एका ४५ वर्षीय महिला शिक्षिकेवर १७ वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. शिक्षिकेवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे शांती नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक एसए इंदलकर यांनी सांगितले. महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

भिवंडी शहरातील कचेरीपाडा बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलाला १७ आणि २८ सप्टेंबर रोजी महिला शिक्षिकेने शरीर सुखाची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. महिलेने या मुलाला तु इतर मुलांना भडकव आणि मास्तरांवर हात उचल तरच तुला शरीरसुख देईन, अशी ऑफर दिली होती. त्यानंतर या शिक्षिकेने मुलाचे लैंगिक शोषण केले.

सहकाऱ्यांसोबत झालेल्या वादातून शिक्षिकेला तीन महिन्यांपूर्वी अधीक्षकांनी निलंबित केले होते. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून चौकशी करण्यात आली, ज्या दरम्यान एका पॅनेलने १७ वर्षीय कैद्यासह अनेकांचे जबाब नोंदवले. ज्या मुलाचा शिक्षकाने लैंगिक छळ त्याने सांगितले की, शिक्षिकेने त्याला इतर शिक्षकांना मारहाण करण्यास सांगितले होते, ज्याच्या बदल्यात तिने त्याला लैंगिक सुविधा देण्याचे वचन दिले होते.

दरम्यान संबंधित महिला शिक्षिकेने संस्था संचालक आणि बालसुधारगृहाच्या उपाधीक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली आहे. या दोघांनी आठ महिन्यापूर्वी अश्लील व्हिडिओ दाखवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिला शिक्षिकेने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ देखील केल्याचे म्हटले आहे. संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणी जिल्हा महिला बाल विकास समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांकडून चौकशी सुरू आहे.

पीडित मुलाच्या वक्तव्याच्या आधारे अधीक्षकांनी मंगळवारी शिक्षकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस.ए.इंदलकर यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.