women cricketer | विराटला प्रपोज करणारी महिला क्रिकेटर अडकली लग्नबंधनात, गर्लफ्रेंडसोबत केला विवाह

इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल व्याटने (women cricketer) तिची गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजसोबत लग्न केले आहे. डॅनियलने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. डॅनियल आणि जॉर्जी हॉज बराच काळ रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघींनी गेल्या वर्षी साखरपुडा केला होता. डॅनियल व्याट ही क्रिकेटपटू आहे, तर जॉर्जी हॉज फुटबॉल संघाची व्यवस्थापक आहे. आता चाहतेही या दोघींच्या लग्नाच्या फोटोंवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

विराट कोहलीला प्रपोज केले होते
2014 मध्ये विराट कोहलीला प्रपोज केल्यामुळे डॅनियल व्याट चर्चेत होती. 2014 मध्ये विराट कोहलीला तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर प्रपोज करताना डॅनियल व्याटने लिहिले होते की, कोहली, माझ्याशी लग्न कर. तिची ही पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर तिने आपल्या पोस्टवर स्पष्टीकरण देत आपण हे केवळ विनोद म्हणून केल्याचे सांगितले होते.

डॅनियल व्याटची क्रिकेट कारकीर्द
डॅनियल व्याटने आतापर्यंत इंग्लंड महिला क्रिकेट (women cricketer) संघाकडून 2 कसोटी, 110 एकदिवसीय आणि 156 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. डॅनियल व्याटच्या नावावर 2 कसोटी सामन्यात 129 धावा आहेत. या काळात तिने अर्धशतकही झळकावले आहे. याशिवाय 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर 1907 धावा आहेत. या कालावधीत तिने 5 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली आहेत. तर डॅनियल व्याटने 156 टी-20 सामन्यात 2726 धावा केल्या आहेत. तिने टी20 मध्ये 14 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप