Women’s Day Special : काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आईचा अनोखा सन्मान, पुण्यातील युवकाने ठेवला समाजासमोर आदर्श

पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरात महिला दिनाचे औचित्य साधून धनंजय भगत या युवकाने चक्क त्याच्या आई व मावशींचा सत्कार समारंभ ठेवला होता. त्याच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

कोथरूड परिसरातील पुण्याई सभागृहात सन्मान ‘ती’ च्या संघर्षाचा हा कार्यक्रम आयोजीत केला होता. कार्यक्रमांतर्गत महिलाचे सन्मान केले गेले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय नगरसेवक दीपक मानकर यांनी भुषविले. अध्यक्षीय भाषणात दीपक मानकर यांनी त्यांच्या आयुष्यात असणारे आईचे महत्व सांगितले व या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ उपस्थित होत्या. आपल्या भाषणातून त्यांनी महिलांना प्रेरित करत सबलीकरणाचे धडे दिले. कार्यक्रमात स्त्रियांवर आधारित कवितांचे सादरीकरण करण्यात आले.

नासा स्पेस प्रशिक्षक लिना बोकील ह्यांनी देखील सहभाग नोंदवला. कल्पना चावला चे उदाहरण देत लीना बोकील यांनी महिलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी मार्गदर्शन केले. व अंतराळ ह्या श्रेत्राची तो़डऒळख करून दिली. शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर यांनी प्रत्यक्ष येऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.

त्यांचबरोबर कार्यक्रमाला वातुंडेगावाचे सरपंच अमोल शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय वांजळे, जानकीराम जगताप, तसेच कौस्तुभ माझीरे, संतोष हारपुडे, मारुती हारपुडे, श्रीकांत शेडगे,ऋषिकेश शेडगे, सचिन मानकर, मनसेचे संजय काळे,गणेश शिंदे, दादा जगताप,आकाश बोबडे,सुरज पांचाळ,यश इंगुळकर आदींनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणांना शाल तसेच कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्वांना पवित्र तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. ‘ती’ ची संर्घष कथा ऐकून सभागृहातील उपस्थितीतांचे डोळे पाणावले.

महिला सन्मानाचा अनोखा उपक्रम घेण्यात आला. याची सुरुवात घरापासूनच व्हावी अगदी जन्मदात्या आई पासून व्हावी असा संदेश ह्या कार्यक्रमातून देण्यात आला. अशा पद्धतीचे कार्यक्रम घरोघरी व्हावे असे आवाहन अध्यक्षांनी केले.