समरसता आणि समता यात बुद्धिभेद करण्याचे काम केले जात आहे – देवेंद्र फडणवीस

पुणे : समरसतेच्या आधारावर भारतीय जनता पक्षाची (BJP) उभारणी करताना प्रा. ना. स. फरांदे (Pro. N.S.Pharande) यांनी दिलेले योगदान दीपस्तंभा प्रमाणे होते, त्यांनी मूल्याधिष्ठित राजकारण केले, त्यांचे कार्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गगार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

‘दीपस्तंभ’ (Deepastambha) या विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या जीवनावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करताना फडणवीस बोलत होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) अध्यक्षस्थानी होते. प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar), ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार योगेश टिळेकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत फरांदे, कार्याध्यक्षा हर्षदा फरांदे, विश्वस्त मंगला फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस पुढे म्हणाले, समरसता आणि समता यात बुद्धिभेद करण्याचे काम केले जात आहे. समता हे उद्दिष्ट आहे, तर समरसता हे त्याकडे पोहोचण्याचा मार्ग आहे. समरसतेच्या आधारावर पक्ष उभा करण्याचे आणि सर्वसमावेशकता आणण्याचे काम भाजपने केले. पक्षाचा राज्यातील चेहरा एक, मात्र त्याला निर्णयाचे कोणतेही अधिकार नाहीत, तर महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून घ्यायचे यापेक्षा वेगळी कार्यपद्धती भाजपने अंगिकारली त्यामुळे पक्षाचा सर्वच क्षेत्रांत विकास झाला.