आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला शिवसैनिकांची नव्हे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी ?

रत्नागिरी : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली. आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या दापोलीlतील मेळाव्याला राष्ट्रवादीची गर्दी जमली होती, असं म्हणत शरसंधान केले आहे. तर दुसऱ्या बाजूला मंत्री उदय सामंत यांनी देखील आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

शिंदे गटातील आमदार योगेश कदमांनी आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर हल्लाबोल करत टोला लगावला. दीड ते दोन हजार जमा करुन शिवसेना वाढणार नाही, असं म्हणत योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलं. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर देणार असल्याचंही ते म्हणाले. 18 तारखेला मेळावा घेऊन सगळ्यांना उत्तर देऊ, असा इशारा योगेश कदम यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचाच उमेदवार हवा होता, मग मला तिकीट का दिलं, असा सवालही योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना उपस्थित केला.

तर दुसऱ्या बाजूला सामंत म्हणाले, आमच्या मतदारसंघात येऊन आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा..मा. एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ठरवले हे योग्य की अयोग्य ते सांगावे..काँग्रेस, एनसीपी बरोबर जाऊ नये हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण  गद्दार कसे..ह्याला धाडस म्हणतात. असं त्यांनी म्हटलं आहे.