सौदी अरेबियाच्या ‘छोट्या शेख’चे वयाच्या २७व्या वर्षी निधन, जगायचा लक्झरी लाइफ

सौदी अरेबिया- सोशल मीडिया स्टार अझीझ अल अहमद (Aziz Al Ahemad) यांचे वयाच्या २७व्या वर्षी निधन झाले आहे. जगातील सर्वात तरुण शेख म्हणून त्यांची ओळख होती. अझीझ अल अहमद यांच्या मृत्यूची बातमी त्यांचा मित्र यझान अल असमर याने दिली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, १९ जानेवारी रोजी त्यांचे निधन (Aziz Al Ahemad Passed Away) झाले. ते आपल्या चाहत्यांवर खूप प्रेम करतात, असे त्यांनी आपल्या शेवटच्या संदेशात म्हटले होते.

अझीझ अल अहमद यांचा जन्म १९९५ मध्ये रियाधमध्ये झाला होता. टिक टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते खूप प्रसिद्ध होते. येथे त्यांचे ९० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय त्यांचे यूट्यूबवर ८ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. एका मॉडेलसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले होते.

अजीज अल अहमद लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते. सोशल मीडियावर त्यांचे खूप चाहते होते. छोटे शेख खूप विलासी जीवन जगत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याकडे एक आलिशान घर होते. त्यांना लक्झरी गाड्यांचीही आवड होती.

अझीझ अल अहमद यांना अल कझम या नावानेही ओळखले जात होते ज्याचा अरबी भाषेत अर्थ बुटका होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजीज जन्मापासून हार्मोनल डिसऑर्डर आणि अनुवांशिक आजाराने त्रस्त होते. ते विवाहित होते आणि त्यांना एक मुलगीही आहे.