बुलढाणा : पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोदी सरकार विविध पक्षातील नेत्यांची हेरगिरी करत असल्याचे काँग्रेसने आरोप करत, केंद्र सरकार याबाबतीत कुठलीही माहिती द्यायला तयार नाही, त्यामुळे काँग्रेसने न्यायालयात धाव घेत, सुप्रीम कोर्टाने या सॉफ्टवेअरची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यावर बोलताना कोर्टाच्या निर्णयाचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वागत केले आहे.
भाजपच्या समितीवर कोर्टाचा विश्वास नसल्याने सुप्रीम कोर्टाने स्वतःची समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत, हे चांगले पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी लातूर येथे केलेल्या विधानावर त्यांना प्रत्युत्तर देत यशोमती ठाकूर म्हणाल्या की जे विविध पक्षातून भाजपामध्ये आले, आणि आता त्यांना इडीची चौकशी लागत नसल्याने शांत झोप लागते अशा नेत्यांवर देखील किरीट सोमय्यांनी बोलावे असा अप्रत्यक्ष टोला हर्षवर्धन पाटील यांना लगाववत किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर दिले आहे. यशोमती ठाकूर या पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
दरम्यान, अच्छे दिनच्या बात मारणाऱ्या सरकारने महागाईने कळस गाठलाय, खोट बोल पण रेटून बोल हेच ब्रीद असलेल्या भाजपच्या राजकारणाला कंटाळून अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथेही भाजपात काम करणाऱ्या काही स्वाभिमानी लोकांनी जुलुमाना कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा आनंद असल्याचे मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o