आपली पोळी शेकली जात नसल्याने माघार; यशोमती ठाकूर यांचा भाजपाला टोला

मुंबई: आपली पोळी शेकली जात नसल्याने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याचा खोचक टोला काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर भाजपाला लगावला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मुंबई येथे त्यांनी हे वक्तव्य केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज मतदान पार पडले यावेळी मुंबई येथील टिळक भवन येथे ॲड. यशोमती ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले.

यामध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेनेच्या अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा विजय निश्चित होताच, मात्र आधी अडथळे निर्माण करणाऱ्यांना स्वतःचा पराभव दिसू लागल्यावर उशीरा शहाणपण सुचलं म्हणायचं; ढोंगीपणा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. यापूर्वी निवडणूक अर्ज भरताना भाजपने जो गोंधळ घातला त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड लोकशाही पद्धतीने मतदान करून होते हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. तसेच गांधी घराणे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.