Year Ender 2022: बॉलीवूडचे चर्चित सितारे, ज्यांच्या निधनाने अवघ्या भारताला रडवले

Year Ender 2022: लवकरच 2022 वर्ष आपला सर्वांचा निरोप घेणार आहे. हे वर्ष भरपूर साऱ्या चांगल्या आठवणींनी भरलेले राहिले. परंतु चांगल्या आठवणींबरोबरच काही दु:खद क्षणही या वर्षाने आपल्याला दाखवले. या दु:खद क्षणांपैकी एक म्हणजे, काही सर्वांचे लाडके बॉलीवूड सितारे यावर्षी जग सोडून निघून गेले, ज्यांना कधीही विसरता येणार नाही.

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकरपासून ते बप्पी लाहिरीपर्यंत, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवपासून गायक केकेपर्यंत असे अनेक तारे आहेत, ज्यांच्या दुःखद निधनाने आपणा सर्वांना रडवले. जाणून घेऊया अशाच प्रसिद्ध स्टार्सबद्दल ज्यांनी 2022 साली जगाचा निरोप घेतला.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

अरुण बाली – 7 ऑक्टोबर 2022
फिल्म इंडस्ट्री असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, सर्वांना अभिनेता अरुण बाली हे नाव परिचित आहे. अरुण बाली यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि टीव्ही मालिकांमध्येही आपला ठसा उमटवला. यावर्षी 7 ऑक्टोबर 2022 रोजी अरुण बाली यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला. ते मोठ्या संख्येने चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसले. 3 इडियट्ससह अनेक मोठ्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. ते शेवटचे अमिताभ बच्चन स्टारर गुडबायमध्ये दिसले होते.

राजू श्रीवास्तव (सत्य प्रकाश श्रीवास्तव) – 21 सप्टेंबर 2022
सत्य प्रकाश श्रीवास्तव, ज्यांना राजू श्रीवास्तव या नावाने ओळखले जाते, ते लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन, अभिनेता आणि राजकारणी होते. त्यांनी आपल्या कॉमेडीने लोकांच्या हृदयात मोठे स्थान मिळवले होते. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना AIIMS, नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आले. 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलीवूड अभिनेता म्हणून, त्यांनी 1989 मध्ये सूरज बडजात्याच्या मैने प्यार किया या सिनेमातील छोट्या भूमिकेतून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांना अनेक सहाय्यक भूमिका साकारायला मिळाल्या.

कृष्णकुमार कुन्नत उर्फ केके- 31 मे 2022
प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ, ज्यांना केके (Soulful Song of Singer KK) म्हणून ओळखले जाते, त्यांनी ‘प्यार के पल’ आणि ‘यारों’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून काम केले. पार्श्वगायक म्हणून त्यांनी ओम शांती ओममधील ‘आँखों में तेरी’, ‘जन्नत के जरा सा बचना ए हसीनो’ मधील ‘खुदा जाने’ अशा अनेक गाण्यांना आवाज दिला.

केके यांनी 31 मे 2022 रोजी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. केकेने दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंच येथे मृत्यूच्या एक तास आधी गुरुदास कॉलेजमध्ये तासभराच्या मैफिलीतही सादरीकरण केले होते.

रमेश देव – 2 फेब्रुवारी 2022
रमेश देव अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून लोकप्रिय होते. हिंदी आणि मराठी चित्रपटांतील अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 1929 मध्ये कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला आणि 1951 मध्ये पाटलाची पोर या मराठी चित्रपटातील छोट्या भूमिकेतून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर 1959 मध्ये अशोक कुमार अभिनीत बाप बेटे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर- 6 फेब्रुवारी 2022
लता मंगेशकर या भारतीय पार्श्वगायिका होत्या, ज्यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती यांच्या घरी जन्मलेल्या ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ लता मंगेशकर या प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका, संगीतकार, निर्माता आणि अभिनेत्री होत्या. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी 1942 च्या किती हसल या मराठी चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यानंतर 1947 मध्ये आप की सेवा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लताजी जवळपास २८ दिवस निमोनिया आणि कोविडशी लढत राहिल्या आणि अखेर 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

बप्‍पी लहिरी- 15 फेब्रुवारी 2022
डिस्को आणि पॉपचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले गायक, संगीतकार आणि निर्माता बप्पी दा यांना कोण ओळखत नाही. 1952 मध्ये पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे बंगाली ब्राह्मण कुटुंबात संगीतकार अपरेश आणि बन्सुरी लाहिरी यांच्या घरात जन्मलेल्या बप्पी लाहिरी यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला वाजवण्यास सुरुवात केली.

त्यांनी भारतीय चित्रपट संगीत जगभर लोकप्रिय केले. बप्पी दा यांनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर बंगाली, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही बॉक्स ऑफिसवर मोठे हिट चित्रपट दिले होते. त्यांची गाणी २१व्या शतकातही लोकप्रिय आहेत. बप्पी लाहिरी यांचे या वर्षी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत स्लीप एपनिया या आजारामुळे निधन झाले आणि ते आपल्याला कायमचे सोडून गेले.