उद्धवजींची मुंबईबाहेर मैदान भरायची कुवत नाही… म्हणुनच मुंबईत सभा घ्यावी लागतेय – मनसे

मुंबई : हिदुत्वांचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने (shivsena) कार्यकर्त्यांना साद घातली आहे. आज मुंबईतील बीकेसी मैदानात (BKC ground) शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS president Raj Thackeray) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे.

गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा (Loudspeaker Issue) घेत महाविकास आघाडी (MVA) आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात (Against corruption) भाजपनेही पोलखोल सभा (Polkhol Sabha) घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना सज्ज झाली आहे.

दरम्यान, मनसेकडून या सभेची सातत्याने खिल्ली उडवली जात असून मनसेचे नेते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी देखील याबाबत भाष्य करत सेनेला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, सर्व शिवसैनिकांना माहीत आहे उद्धवजींची मुंबईबाहेर मैदान भरायची कुवत नाही… म्हणुनच मुंबईत सभा घ्यावी लागतेय. आज जर उद्धवजींनी औरंगाबादच (Aurangabad)  नामकरण संभाजीनगर (Sambhaji Nagar)  केलं तरच त्यांच हिंदूत्व असली माना. असं त्यांनी म्हटले आहे.