राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या मिटकरींना योगेश खैरेंनी धुतलं; म्हणाले, हा राजकीय जोकर… 

Mumbai –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांची चांगलीच धुलाई केली. राज ठाकरे शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात जबरदस्त फटकेबाजी केली. राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती वर भाष्य केले. यावेळी त्यांनी आपण येत्या ६ जून रोजी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर जाणार असल्याची देखील घोषणा केली आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा.. महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जुन ला "रायगड" जाणार असं समजल, पण हे महाशय गड चढुन जाण्याची हिम्मत करतील का ? कसं आहे ,गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे. असं म्हणत मिटकरी यांनी ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

 

दरम्यान, या टीकेला मनसेने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी मिटकरी यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,  महाराष्ट्रातील दुर्लक्षित राजकीय जोकर महागाई, शेतकरी, बेरोजगारी यावर बोलायला सांगत आहे. पण मग अनेक वर्षे सत्तेत राहून काय केलं हे या जोकरने आपल्या पक्षात एकदा विचारलं पाहिजे. रायगडावर नतमस्तक होण्यासाठी निर्मळ शिवप्रेमाची भावना महत्वाची असते, बाजारबुणग्या वृत्तीला ते नाही कळायचं! असं म्हणत खरे यांनी मिटकरी यांची धुलाई केली आहे.