ये बिड्डा, ये मेरा अड्डा : उत्तर प्रदेशात योगींचाच करिष्मा, काँग्रेसचा सुफडासाफ !

लखनऊ : उत्तर प्रदेशसह भाजपचा वियजाचा वारू पुन्हा एकदा चौफेर उधळलाय. पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी लखनऊमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात येतोय.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपला २६७ जागांवर विजय मिळाला आहे. तर दुरीकडे प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या काँग्रेसला अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसची ही झालेली वाताहत काँग्रेसच्या नेतृत्वाला नक्कीच वेगळा विचार करायला लावणार आहे. तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी करत १३१ जागांवर बाजी मारली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या यशस्वी नेतृत्वात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार बनत आहे. या सर्व राज्यात पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला जनतेनं आशीर्वाद दिलाय. मी सर्वात प्रथम पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि सर्व नेत्यांचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात भाजप चार राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्यात यशस्वी ठरला. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. आज भाजप आणि मित्र पक्ष उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. या बहुमतासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेचं अभिनंदन आणि आभार मानतो. असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटल आहे.