गायिका ‘योगिता बोराटे’ यांचे नवरात्रीनिमित्त खास गुजराती गाणे रिलीज

Yogita Borate

पुणे : प्रसिद्ध गायिका ‘योगिता बोराटे’ यांनी नवरात्रीचे औचित्य साधत ‘घोर अंधारी रे’ हे खास गुजराती गाणे रिलीज केले. या गाण्यात पारंपारिक गरबा सादर केला आहे. तसेच योगिता बोराटे यांनी हे गाणं गायलं असून ‘योगेश रायरिकर’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर प्रिती संपत यांच्या नृत्यम डान्स अकॅडमीतील दोघांनी नृत्याविष्कार सादर केला आहे.

गायिका ‘योगिता बोराटे’ या गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या ‘स्वरमेघा क्रिएशन्सच्या’ संस्थापिका आहेत. तर त्यांची ‘स्वरमेघा म्युझिक’ अकॅडमी देखिल आहे. ‘स्वरमेघा क्रिएशन्सच्या’ अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. तर याआधी त्यांची ‘दिल लगी ये तेरी’ आणि ‘हम हात जोडे दोनो’ ही ओरिजनल हिंदी गाणी प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये त्यांनी २ ते ३ महिने संगीत कार्यक्रम केलेले आहेत.

गायिका योगिता बोराटे ‘घोर अंधारी रे’ या गुजराती गाण्याविषयी म्हणतात, “मी मुळची बडोद्याची असल्यामुळे मी नवरात्री हा सण फार जवळून पाहिला आहे. तेथील गरबा प्रेक्षणीय आणि श्रवणीय असतो. जितकी गर्दी गरबा खेळण्यासाठी असते तितकीच गर्दी ती गरब्यातील गाणी ऐकण्यासाठी असते. आणि आजही बडोद्यात अजूनही असाच गरबा अनुभवायला मिळतो. माझा संगितकार मित्र योगेश रायरिकर तोही बडोद्याचाच आहे. तर आम्ही दोघांनी मिळून हे गाणं करायचं ठरवलं.”

पुढे योगिता, या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा सांगतात, “अवघ्या १० दिवसांत बनवलेलं हे माझं पहिलचं गाणं आहे. खरंतर कोणत्याही गाण्याच्या प्रोसेसिंगला फार वेळ लागतो. रेकॉर्डींग पासून ते चित्रीकरणापर्यंत ब-याच गोष्टी असतात. संपूर्ण गाण्याचं प्रोसेसिंग सुरू असताना अनेक अडचणी आल्या, हातात वेळही कमी होता. परंतु अंबामातेच्या कृपेमुळे हे गाणं पूर्ण होऊ शकले. या गाण्याची प्रोग्रामींग आणि मिक्सींग सुरतला झाली, या गाण्याचं लाईव्ह रिदम बडोद्याला झालं, तर ऑडीओ मुंबईतील आजीवासन स्टुडिओत झाला. एक गाणं इतक्या ठिकाणी ट्रॅव्हल करत ते आज देवी मातेच्या आशीर्वादाने रिलीज झालं. या गाण्यात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली. त्या सर्वांचे मी ऋणी आहे.”

हे ही पहा:

Previous Post
Chandrakant Patil And Uddhav Thackeray

उद्धवजी लोण्याचा गोळा कोण मटकावतंय तुमच्या लक्षात आलंय का ? – चंद्रकांत पाटील

Next Post
Sanjay Raut On Farmers Protest

महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे – संजय राऊत

Related Posts
राज ठाकरें

‘राज ठाकरेंच्या सभेमुळे शांतीप्रिय नागरिक चिंतीत; सभेला परवानगी दिली तर रस्त्यावर उतरू’

औरंगाबाद – मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड…
Read More
आशिष शेलार

ठाकरे सरकारने बिल्डर, बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा – आशिष शेलार

नागपूर –कोरोना काळात ठाकरे सरकारने बिल्डर बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजपा आमदार…
Read More

पहिल्या वनडेत न्यूझीलंडने भारताचा उडवला धुव्वा; लॅथम, विलियम्सन विजयाचे शिल्पकार

ऑकलँड: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ईडन पार्क येथे झालेला पहिला वनडे सामना यजमानांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना…
Read More