जीवनविमा पॉलिसीवर कर्जही मिळते , हे आहेत नियम…

जीवनविमा पॉलिसी काढल्यामुळे केवळ सुरक्षाकवचच मिळते, असे नाही ; तर एलआयसीच्या जीवनविमा पॉलिसीमध्ये आपण भरलेल्या हप्त्यांपोटी कर्ज मिळण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी काय नियम आहेत ते आज पाहुयात ;
कर्ज मिळण्यासाठी किमान तीन वर्षांचे हप्ते पॉलिसीधारकाने भरलेले असले पाहिजेत . अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या जास्तीत जास्त 85 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कर्जासाठी आपण केवळ व्याज भरावे लागते. कर्जाची रक्कम पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर कंपनी वजा करुन घेते आणि उर्वरित रक्कम पॉलिसीधारकाला परत करते.

कर्ज मिळवण्यासाठी आपण विमा प्रतिनिधीची मदतही घेऊ शकतो. अन्यथा एलआयसीच्या वेबसाईटवरुनही यासाठी अर्ज करता येतो. संकेतस्थळावर पॉलिसी ऑप्शन्स या विभागावर क्लिक करून आपल्याला सर्व माहिती भरावी लागते. यानंतर एक फॉर्म डाऊनलोड करावा लागतो आणि तो पूर्ण भरुन स्वाक्षरी करुन, स्कॅन करून पुन्हा एलआयसीच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागेल. यानंतर कर्जासाठीची प्रक्रिया सुुरू होते. एलआयसीकडून कर्जाचे पैसे पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात जमा केले जातात.

कर्ज घेतल्यानंतर आपली पॉलिसी एक प्रकारे विमा कंपनी गहाण ठेवून घेते. त्यामुळे कर्जासाठीच्या दस्तावेजांची जमवाजमव करताना सर्वप्रथम पॉलिसीची मूळ प्रत असणे आवश्यक आहे.