‘रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता, असं म्हटलं तर किती मिर्ची लागली’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CN Thackeray) यांनी काल (शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनेसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा पार पडली. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खणखणीत प्रत्युत्तर दिले.

बाबरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत  येणार आहे.

रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता, असं म्हटलं तर किती मिर्ची लागली. मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, अरे उद्धवजी, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करु? अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं (Fadnavis gave a blunt reply to Thackeray).