पुण्यात नेमकं चाललंय काय ? शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.(Crime incidents are increasing in Pune from last few days.)  एका बाजूला कोयता घेवून दहशत माजवणारी टोळी (Koyata gang) पोलिसांची डोकेदुखी बनली असताना आता शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना वडगाव शेरी (Vadgaon Sheri)परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूलसमोर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी दोन तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते.(Pune Crime )

अमित सिंह असं जखमीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मा सनसिटीजवळ असलेल्या अर्नोल्ड स्कूलजवळ सागर गायकवाड, अक्षय खामकर, रोहित क्षत्रिय, रोहित जेधिया, सिद्धार्थ शिंदे आदी तरुण शेकोटी करीत बसलेले होते. त्या ठिकाणी अमित सिंह हा गेला. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. या वादातून या अमित सिंह याची गाडी फोडण्यात आली.(pune crime news today)

चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.