पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून आलेल्या तरुणाला १० किलो १३८ ग्रॅम गांजासह अटक केली.हरिश मगन सोनवणे (वय २७, रा. काळभैरवनगर, पिंपरी गाव, मुळ रा. शिरपूर, जि. धुळे) असे या आरोपीचे नाव आहे.
२० मार्च रोजी पिंपळे सौदागर येथे संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) आरोपीला तपासले असता त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. यावेळी १० किलो १३८ ग्रॅम गांजा, मोबाईल आणि दुचाकी असा ५.८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आमदार सुरेश धस अडचणीत; राजीनाम्यासह नार्को टेस्टची मागणी
उन्हाळी सुट्टीत एसटीचा थंडगार प्रवास, राज्यभर 872 शिवशाही बसेस धावणार
पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार; पुणे महापालिकेचा इशारा