Zika patient | राज्यात झिकाचे १४० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक १०९ रुग्ण पुण्यातले आहेत. राज्यातील एकंदर रुग्णांपैकी जवळपास निम्म्या गर्भवती आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचबरोबर तापाच्या रुग्णांच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.
राज्यात झिकाच्या २ हजार ६८ संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले; त्यातील १४० जणांना झिकाचं निदान झालं आहे. त्यातील ६३ गर्भवती आहेत.
झिकाच्या रुग्णांना (Zika patient) रुग्णालयात दाखल व्हावं लागत नाही. या रोगामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे नागरिकांना ताप आल्यावर घाबरून न जाता डॉक्टरांना दाखवून वेळीच उपचार घ्यावेत,असं आवाहन राज्य आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केलं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शपथविधीपूर्वी सागर बंगल्यावर हालचालींना वेग, शरद पवारांच्या खासदाराची फडणविसांशी भेट
भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde