पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची (Zika in Pune) बाधा झाली आहे; त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. पुण्यातल्या झिका रूग्णांची संख्या आता 45 झाली आहे. झिकाबाधित रुग्णांच्या इतर गुंतागुंतीच्या तपासण्याही आरोग्य विभाग करत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिलं आहे.
एकीकडे झिका रुग्णांची (Zika in Pune) संख्या वाढत असताना पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे. या महिन्यात डेंग्यूचे 11; तर चिकनगुनियाचे 8 रुग्ण आढळून आले असल्याचं महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी आकाशवाणीसोबत बोलताना सांगितलं.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Sharad Pawar : आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका, शरद पवारांची स्पष्टोक्ती
Piyush Goyal : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी, पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
Prakash Ambedkar : राजकीय चेहरा दाखवू तरच आपण आरक्षण टिकवू; ॲड. प्रकाश आंबेडकर