‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र…

'झिम्मा'वर थिरकणार अवघा महाराष्ट्र...

मुंबई : ‘झिम्मा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. ‘झिम्मा’ कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. “खेळू झिम्मा गं.…” हे या गाण्याचे बोल असून या मोन्टाज सॅान्गचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना थिरकवणारे आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक आपण पाहिली आणि ऐकली आहे.

हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे ऐकताना आपल्याला आपल्या सहलीची आणि मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही. अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंड ला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Previous Post
किरीट सोमय्या यांचा धडाका सुरूच; २७ तारखेला 'या' जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार

किरीट सोमय्या यांचा धडाका सुरूच; २७ तारखेला ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार

Next Post
MSEB

महावितरणच्या अधिकाऱ्यास धक्काबुक्की; थकबाकीदार वीजग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts
World's Smallest Town

जगातील असे शहर ज्यात ३० पेक्षा कमी लोक राहतात! हे कोणते शहर आहे?

World’s Smallest Town : पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी जाणून किंवा पाहून आश्चर्य वाटते आणि अनेक प्रकारचे…
Read More
दारू

घरपोच दारू करण्यासाठी परवानगी द्या; ISWAI ची सरकारकडे मागणी 

नवी दिल्ली-  इंडस्ट्री असोसिएशन इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया (ISWAI), जे भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय मद्य कंपन्यांचे…
Read More
Suicide News | मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना

Suicide News | मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना

महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी विकास चंद्र रस्तोगी आणि पत्नी राधिका रस्तोगी यांची मुलगी लिपी (२७ वर्ष) हिने मुंबई,…
Read More