Raveena Tandon | मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केल्याचा आरोप; व्हायरल व्हिडीओवर अखेर रवीना टंडनने सोडलं मौन

नुकताच अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ (Raveena Tandon Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत काही लोक रवीनासोबत कसे वाद घालत आहेत आणि धक्काबुक्की करत आहेत, हे दिसत आहे. यासोबतच रवीनाच्या ड्रायव्हरने महिलेच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप व्हिडिओत करण्यात आला आहे. तसेच रवीनाने वृद्ध महिलेला शिविगाळ व मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सर्व आरोप बिनबुडाचे असून दोन्ही बाजूंनी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान याप्रकरणी अखेर रवीनाने मौन सोडलं असून इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने प्रतिक्रिया दिली आहे.

रवीनाने (Raveena Tandon) तिच्या इन्स्टाग्रामवर काही बातम्यांचे पोस्ट शेअर केले आहेत. ‘रवीना आणि तिच्या ड्राइव्हरवर खोटे आरोप’, ‘कोणालाच कारची धडक लागली नव्हती, कोणीच जखमी झालं नव्हतं’, ‘रवीना मद्यधुंद अवस्थेत नव्हती, ड्राइव्हरची मदत करण्यासाठी ती घरातून आली होती’, ‘धक्क्यातून सावरत रवीनाने तिच्या कार ड्राइव्हरला कसं वाचवलं?’, ‘माझ्या ड्राइव्हरला हात लावू नका, मी विनंती करते, त्याला मारू नका’, ‘रवीना टंडनवर जमावाचा हल्ला’, अशा आशयाच्या सर्व बातम्या रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like