Ajit Pawar | महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार, अजित पवारांकडून नव्या योजनेची घोषणा

विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) मांडत आहेत. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत आहे. या अऱ्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी काही नवीन योजनांची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत, अशी घोषणा अजित पवारांनी (Ajit Pawar) अर्थसंकल्पात केली आहे. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा रकरण्यात आली आहे.

स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, अशी घोषणाही यावेळी अजित पवारांनी केलीय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like