अरुणाचल प्रदेश निवडणूक निकाल : भाजप 27 जागांवर विजयी, विरोधकांचा टांगा पलटी 

Arunachal Pradesh Assembly Elections Result : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून निकालांच्या प्राथमिक कलांनुसार अरुणाचल प्रदेशात भाजप बहुमताच्या दिशेने विजयी आगेकूच करत आहे. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या ६० जागांपैकी सध्या भाजप ४६ जागांवर पुढे असून एन पी ई पी पक्ष ६ जागांवर तर इतर पक्ष ७ जागांवर आघाडीवर आहेत.

विशेष म्हणजे कॉँग्रेसला आतापर्यंत विजयासाठी एकाही जागेवर खाते उघडता आलेले नाही. सिक्कीममध्ये ३२ जागांपैकी प्रेमसिंह तमंग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा अर्थात एस के एम पक्ष ३१ जागांवर आघाडीवर असून मोठा विजय संपादन करण्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेशमधील मतमोजणीदरम्यान रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इटानगर येथील भाजप कार्यालयाबाहेर फटाके फोडले. सत्ताधारी भाजप ३१ जागांवर आघाडीवर असताना आणि ट्रेंडमध्ये १५ जागा जिंकत असताना त्यांनी ही आतषबाजी केली.

महत्वाच्या बातम्या-

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

You May Also Like