Arbaaz Khan | वयाच्या 56व्या वर्षी अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा, पत्नी शूरासोबत रुग्णालयाबाहेर झाला स्पॉट

सलमान खानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) गेल्या वर्षी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत दुसरे लग्न केले. तेव्हापासून हे कपल नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच अरबाज आणि शूरा एका प्रसूती रुग्णालयाबाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर अरबाज आणि शूरा खान लवकरच आई-वडील होणार असल्याची अफवा पसरली आहे.

अरबाज-शूरा हॉस्पिटलबाहेर दिसले
अरबाज (Arbaaz Khan) आणि शूरा खान 2 जुलै रोजी शहरातील एका मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अरबाज खान हिरव्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्स परिधान केलेल्या कॅज्युअल पोशाखात दिसत होता, तर शूरा खान डेनिम शॉर्ट्ससह क्रॉप-टॉप आणि ओपन शर्टमध्ये दिसत होती. पॅप्सने प्रसूती क्लिनिकमधून बाहेर पडलेल्या जोडप्याला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. दरम्यान, एका पापाराझीने अरबाजला विचारले की काही चांगली बातमी आहे का? यावर अभिनेता-चित्रपट निर्मात्याने मौन बाळगले आणि उत्तर न देण्याचा निर्णय घेतला. तथापि, शूरा थान पॅप्सच्या प्रश्नावर थोडेसे लाजल्याची दिसून आले. नंतर हे जोडपे त्यांच्या कारमध्ये बसले आणि पापराझींकडे दुर्लक्ष करून तेथून निघून गेले.

शूरा खान अरबाजला भेटण्यासाठी विमानतळावर धावली
याआधी मंगळवारीच शूरा खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती पती अरबाज खानला भेटण्यासाठी विमानतळावर धावताना दिसत होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शूरा पांढऱ्या रंगाच्या जॅकेटसह काळ्या कपड्यात दिसली होती. यादरम्यान, ती शटरबग्सना रस्ता देण्यास सांगत वेगाने चालताना दिसली आणि नंतर अचानक ती कॉफी शॉपच्या दिशेने धावू लागली. काही वेळाने शूरा अरबाज खानसोबत बाहेर येताना दिसली. त्यांनी कॅमेऱ्यासाठी पोझही दिली आणि काही मनोरंजक संभाषणेही केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like