Legislative Council | विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह ‘या’ 5 नावांवर दाखवला विश्वास

विधान परिषदेच्या (Legislative Council) रिक्त झालेल्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान भाजपाने विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेसाठी (Legislative Council) 10 नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली होती. अशातच भाजपाच्या केंद्रीय समितीने 5 नावांवर शिक्कामोर्तब केला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like