Devendra Fadnavis | इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा…; फडणवीसांची टोलेबाजी

Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशातील लोकसभेच्या एकंदर 543 जागांपैकी भारतीय जनता पक्ष-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं 292, तर काँग्रेस-प्रणीत इंडिया आघाडीनं 233 जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.

दरम्यान, देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like