Marathi actress | ‘गरोदरपणात ९ महिने बिअर प्यायले अन्..’, मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव

Marathi actress | गरोदरपणात एका स्त्रीच्या शरीरात भरपूर बदल होतात. ९ महिने ९ दिवसांच्या या काळात महिलांना स्वतःची फार काळजी घ्यावी लागते. या काळात महिलांना खाण्याचे डोहाळेही लागतात. मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर हिनेही तिच्या गरोदरपणातील किस्सा सांगितला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री (Marathi actress) आई झाली. या गरोदरपणाच्या काळात तिला अजब डोहाळे लागले होते. याबद्दल तिने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले आहे. अभिनेत्रीला तिच्या गरोदरपणात बिअर प्यायचे डोहाळे लागले असल्याचे म्हटले आहे. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी सांगितले आहे. या मुलाखतीत तिने तिच्या गरोदरपणा व त्यानंतरच्या काळाबद्दल भाष्य केलं आहे.

यावेळी अदितीने असं म्हटलं की, “गरोदरपणाच्या सुरुवातीला मी खूपच उत्सुक होते. मला तेव्हा बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मी भारतीय पदार्थ काही खाल्लेच नाहीत. मी तेव्हा फक्त सलाड खायचे आणि बिअरच प्यायचे. मी बिअर प्यायले नाहीतर मला कसंतरी व्हायचं, मला राग यायचा. तर मी डॉक्टरांना विचारले काय करु?, तर ते म्हणाले ठीक आहे. दोन-दोन सिप घ्या. मग मी नऊ महिने बियरच प्यायले”.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like