Ashok Chavan | खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा केली.

गुरुवारी सायंकाळी रेलभवन येथे झालेल्या या भेटीत खा. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांकडे रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली. यामध्ये बहुप्रतिक्षित नांदेड-बिदर रेल्वे मार्ग आणि नव्याने प्रस्तावित केलेला नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचाही समावेश होता. हे रेल्वे मार्ग पूर्णत्वास आल्यास प्रवाशांसह समाजातील विविध घटकांना लाभ मिळणार असून, या परिसरातील अर्थकारणालाही गती लाभेल, असे खा. चव्हाण यांनी यावेळी रेल्वे मंत्र्यांना सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like