Exit Poll Results : ‘एक्झिट पोलनुसार जर निकाल आले तर नक्कीच काहीतरी गडबड आहे’ 

Exit Poll Results :  लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा मोदी सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपने यावेळी ४०० पार असा नारा दिला असला तरी त्यांना अपेक्षित ४०० जागा मिळत नसल्याचंही एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, कुणाला किती जागा मिळणार? हे ४ जूनला निकालानंतर स्पष्ट होईल.

मंगळवारी ४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधी, खाजगी दूरचित्र-वृत्तवाहिन्या आणि अन्य प्रतिनिधी संस्थांनी एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल चाचणीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA, लोकसभा निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवणार असल्याचं, बहुतांश अंदाजांमध्ये दिसून येत आहे. 272 जागांचा बहुमताचा टप्पा सहजी ओलांडत राष्ट्रीय लोकशाही आघाडी 543 सदस्यांच्या लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवू शकेल असा अंदाज अनेक संस्थांनी वर्तवला आहे.

दरम्यान एक्जिट पोलनुसार देशभरात मोदीच पुन्हा पंतप्रधान पदी निवडून येणार असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजावर विजय वडेट्टीवारांनी (Vijay Vadettiwar) शंका व्यक्त केली आहे. “सत्ताधाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे असे आकडे सांगितले जातात. जनतेचा राग संपूर्ण देशभरातून दिसत होता. परंतु, एक्झिट पोलनुसार जर निकाल आले तर नक्कीच काहीतरी गडबड आहे”, असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं. ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

You May Also Like