LokSabha Election Results 2024 | अमरावतीत चुरशीची लढत, भाजप उमेदवार नवनीत राणा 9442 मतांनी आघाडीवर

LokSabha Election Results 2024 LIVE Updates |- राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील 1 लाख 26 हजार 279 मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी करण्यात येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणपणे निकालाचे कल लक्षात येणार आहेत. तर रात्री आठ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत.

दरम्यान, अमरावतीमध्ये बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 1,30,169 मतं मिळाली आहेत. तर नवनीत राणा यांना आतापर्यंत 1,39,611 मतं मिळाली आहेत. अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा आणि मविआचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात चुरशीची लढत (LokSabha Election Results 2024) सुरू आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like