Loksabha Election Results 2024 | नंदूरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी; म्हणाले, “पहिल्या दिवसापासूनच आम्हाला…”

Loksabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. राज्यात सत्तापालट होण्याची चित्रे आहेत. मतांचे कल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसत आहेत, तर महायुती पिछाडीवर पडले आहे. दरम्यान नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे. नंदूरबारमधून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी (Gowal Padavi) विजय झाले आहेत.

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली मुसंडी मारल्यामुळे (Loksabha Election Results 2024) कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. २६ व्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराला एक लाख ७२ हजार मतांचं लीड मिळालं आहे. अनपेक्षित असा निकाल लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून येत आहे.

विजयानंतर बोलताना नवीन खासदार पाडवी म्हणाले, विजयाचा विश्वास पहिल्या दिवसापासून आम्हाला होता. देशात बदल हवा होता. याची सुरुवात नंदुरबार पासून झाली आहे. देशात देखील आता काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा विश्वास नवीन खासदार गोवाल यांनी व्यक्त केलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like