Loksabha Election Results 2024 | मुंबईत ठाकरे गटाचे सर्व शिलेदार आघाडीवर, शिंदे गटाला कडवी लढत

Loksabha Election Results 2024 | शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी लोकसभा निवडणूक २०२४ अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातही मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे मुंबईतील सहाही मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान दुपारपर्यंत मुंबईतील चार जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांना १ लाख ४० हजार ८७८ मते मिळाली असून शिंदे गटाचे रविंद्र वायकर अवघ्या १ हजार मतांनी मागे आहेत.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना मागे (Loksabha Election Results 2024) पाडलं आहे. संजय पाटील यांना १ लाख ७२ हजार ९१४ मते आतापर्यंत मिळाली असून मिहिर कोटेचा ३ हजार १२५ मतांनी मागे आहेत.

मुंबई दक्षिण विभागातून अरविंद सावंत यांना १ लाख २५ हजार ५९८ मते मिळाली असून शिंदे सेनेच्या यामिनी जाधव ३६ हजार ०२८ मतांनी मागे आहेत.

तर, दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना १ लाख ९९ हजार ७७ मते मिळाली असून शिंदे गटाचे विद्यमान खासदार १५ हजार मतांनी मागे आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like