LokSabha Election Results 2024 | कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष; शाहू महाराजांची आघाडी

LokSabha Election Results 2024 | राज्यात सध्या महायुतीचे ग्रह फिरले असल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली असून जवळपास २७ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. शाहू महाराज छत्रपती यांना ५० हजारांहून अधिक मतांची आघाडी आहे.

छत्रपती शाहू महाराज हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच संजय मंडलिक यांच्यापेक्षा आघाडीवर (LokSabha Election Results 2024) आहेत. त्यामुळे शाहू महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरकर न्यू पॅलेसवर दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांची आघाडी दिसत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like