Loksabha Election Results 2024 | राहुल गांधी यांचा रायबरेलीतून विक्रमी विजय, 4 लाखांच्या आघाडीसह उधळला गुलाल

Loksabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. एनडीए सरकार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. असे असले तरीही 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला यंदा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीने 200 जागांचा टप्पा  पार केला आहे. काँग्रेसच्या या यशात राहुल गांधी यांचा मोठा वाटा राहिला आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विक्रमी विजय मिळवला आहे. 4 लाख मतांच्या आघाडीसह राहुल गांधी रायबरेलीतून विजयी झाले आहेत.

यासह राहुल गांधी यांनी सोनिया गांधीच्या विजयाचा (Loksabha Election Results 2024) विक्रम मोडला आहे. राहुल गांधीनी 222219 पेक्षा अधिक मतांनी आघाडी मिळवत सोनिया गांधीचा विक्रमही मोडला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like