LokSabha Election Results 2024 | शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी, 10 पैकी 10 जागांवर आघाडी

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात टफ फाईट (LokSabha Election Results 2024) पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार महाविकास आघाडीकडे 25 जागा असून महायुती 22 जागांसह सध्या पिछाडीवर आहे. महाविकास आघाडीत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शांतीत क्रांती केली असल्याचे दिसत आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.

शरद पवारांची कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी मतांमध्ये जोरदार मुसंडी घेतली असून 19 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिरुरमध्ये सकाळपासून अमोल कोल्हे आपली आघाडी टिकवून आहेत. पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी 25088 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि साताऱ्यात शशिकांत शिंदे मोठी आघाडी घेताना दिसत आहेत.

चौथी फेरीअखेर भास्कर भगरे 6989 मतांनी पुढे आहेत. मंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली आहे. रावेरमधून राष्ट्रवादी एस पी श्रीराम पाटील यांनी दहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती. रावेरमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. वर्ध्यामधून 11 वाजेपर्यंत अमर काळे आघाडीवर (LokSabha Election Results 2024) आहेत. भाजपचे सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके यांनी 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like