Loksabha Election Results 2024 | कल्याणमध्ये शिंदेंचा बोलबाला, श्रीकांत शिंदेंची आठव्या फेरीअखेर १ लाख मतांची आघाडी 

Loksabha Election Results 2024 | कल्याण लोकसभा मतदारसंघात मागील १० दहा वर्षांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बोलबाला राहिला आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा लढवण्याची संधी मिळाली. यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महिला नेतृत्वावर जबाबदारी सोपवली. ठाकरे गटाने कल्याण लोकसभेतून वैशाली दरेकर (Vaishali Dareker) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र लोकसभेच्या सुरुवातीच्या कलानुसारही कल्याणमध्ये शिंदेंची शिवसेनाच मुसंडी मारताना दिसत आहे.

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे १ लाख १८ हजार ४१६ मतांनी आघाडीवर (Loksabha Election Results 2024) आहेत. आठव्या फेरीतील मतमोजणी पार पडली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख ३३ हजार ७३४ मतं मिळाली आहेत, तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना १ लाख १५ हजार ३१८ मतं मिळाली आहेत. शिवसेना श्रीकांत शिंदे यांना १ लाख १८ हजार ४१६ मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like