Loksabha Election Results | विरोधकांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली; मोदींचे विरोधकांना एका वाक्यात उत्तर

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election Results) राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशातील लोकसभेच्या एकंदर 543 जागांपैकी भारतीय जनता पक्ष-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं 292, तर काँग्रेस-प्रणीत इंडिया आघाडीनं 233 जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा (Loksabha Election Results) मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.

लोकसभा निकालानंतर इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विरोधकांनी एकजूट होऊनही जितक्या जागा जिंकल्या नाहीत तितक्या जागा भाजने एकट्याने जिंकल्या आहेत असं म्हणत PM मोदींचे INDIA आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. आंध्रप्रदेश, ओडिशा, सिक्कीमसह अनेक राज्यात काँग्रेसचा सापडासुप झाला आहे. अनेक उमदवारांचे डिपॉझिट देखील धोक्यात आले आहे असे ते म्हणाले.

ओडिशात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. भाजपने केरळातही विजय मिळवला आहे. तेलंगणामध्ये भाजपचा आकडा दुपटीने वाढला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल अशा अनेक राज्यांमध्ये भाजपने क्लीनस्वीप केला आहे. सलग तिसऱ्यांदा जनतेने आम्हाला निवडले आहे. माझ्या आईच्या गेल्यानंतर ही माझी पहिली निवडणुक आहे. मात्र, या देशातील माता, भगिणी तसेच महिलांनी मला आईची कमी जाणवू दिली नाही. देशभरातील महिलांनी मला पाठिंबा दिला असे मोदी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like