Loksabha Election Results | इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उप-पंतप्रधान पदाची ऑफर?

लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Election Results) हळूहळू येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए पुढे आहे. पण, निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीही पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. एनडीए 299 जागांवर पुढे आहे. यामध्ये जेडीयूच्या 14 जागांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यात जेडीयूची महत्त्वाची भूमिका असू शकते. दरम्यान, इंडिया आघाडीने नितीश कुमार यांना उपपंतप्रधान बनवण्याची ऑफर दिली असल्याचे समजत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र, जेडीयूकडून एनडीएचाच एक भाग राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जेव्हा नितीश कुमार बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार चालवत होते आणि काँग्रेसशिवाय आरजेडीही त्यांच्यासोबत होते, तेव्हा नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी बैठका सुरू केल्या होत्या, पण नंतर त्यांनी महाआघाडी सोडली होती .

एवढेच नाही तर महाआघाडी सोडल्यानंतर नितीश कुमार भाजपशी हातमिळवणी (Loksabha Election Results) करून एनडीएचा भाग बनले होते. त्यामुळेच सध्या राजकीय पेच अधिक बिकट बनले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like