Lonavala News | मोठी दुर्घटना! भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण गेले वाहून

पावसाळा सुरू झाला की पुण्यातील लोणावळा (Lonavala News) येथे पर्यटकांची मोठी गर्दी जमते. पावसाळ्यात लोणावळ्याचे सौंदर्य अधिक खुलते. त्यामुळे येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक दूर वरुन येतात. अशातच वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

रविवारी सुट्टी असल्यामुळे भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अन्सारी कुटुंबही या धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते. परंतु शुक्रवार, शनिवार दोन्ही दिवस लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला होता. शिवाय रविवारीही पावसाच्या सरी कोसळत असल्याने धबधब्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. याच कारणामुळे धबधब्यात उतरलेले अन्सारी कुटुंब पाण्याच्या वेगामुळे वाहून गेले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील ५ जणांनी जीव गमावला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात (Lonavala News) येते, तिथं शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांपैकी लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like