Maharashtra Loksabha Election Results | महाराष्ट्रात फक्त रिंगसाईड साईड रिसर्चचा एक्झिट पोल ठरला अचूक

पुणे | देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Loksabha Election Results) घोषित झाले.. यात अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत ..महाराष्ट्रात महायुतीची जोरदार पीछेहाट झाली आहे.. तर महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले आहे.. निवडणूक झाल्यानंतर विविध संस्थांनी जे एक्झिट पोल वर्तवले होते.. त्यात रिंगसाईड रिसर्च या जनमत चाचणी करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकसभा जागांविषयी वर्तवलेला अंदाज जवळपास अचूक ठरला आहे.

निवडणूक झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल मध्ये रिंगसाईड रिसर्च (Maharashtra Loksabha Election Results) ने महाविकास आघाडीला 29 ,तर महायुतीला 18 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता तर अपक्ष म्हणून सांगलीतुन विशाल पाटील विजयी होतील असेही रिंगसाईड रिसर्च ने सांगितले होते..जालन्यातुन रावसाहेब दानवे पराभूत होतील असे सांगणारा एक्झिट पोल हा रिंगसाईड रिसर्चचाच होता.

एक्झिट पोलचे आकडे देत असताना यात 3 टक्क्यांचा कमी जास्त एरर असेल असेही रिंगसाईड रिसर्च चे म्हणणे होते… त्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर जे आकडे आले त्यात महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 आणि अपक्ष विशाल पाटील 1 असा निकाल जाहीर झाला आहे.. त्यामुळे पुन्हा एकदा रिंगसाईड रिसर्च चा एक्झिट पोल खरा ठरला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like